प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली पैकी सोनतळी नवीन वसाहती मध्ये पंडित बळवंत पाटील यांच्या पुनर्वसन ठिकाणी बांधलेल्या घरी गेल्या तीन महिन्यापासून अशोक नगर- कोलकत्ता येथून आलेले सतरा लोक ज्वारी विक्रीच्या निमित्ताने येथे येऊन भाड्याने एकत्र राहात आहेत. याठिकाणी ज्वारीचे गोडाऊन आहे. बुधवारी १७ पैकी अनिल घोष या साठ वर्षीय झाला आजाराची लक्षणे आढळली सीपीआर येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या रुग्णास हाय रिस्क म्हणून उपचार सुरू केले आहेत.
दरम्यान खबरदारी म्हणून त्याच्यासोबतच्या सोळा लोकांची माहिती संकलित करण्यासाठी गेलेल्या पथकाला शिवा नावाच्या व्यक्तीने अत्यंत उद्धट व अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि माहिती देण्यास अटकाव केला यावेळी पथकाने पोलिसांना पाचारण केले आणि माहिती संकलित केली, शासनाच्या निर्देशानुसार पथकाने दिलेली कोणतीही सूचना हाय रिस्क म्हणून आलेले रिपोर्ट या १६ लोकांनी मान्य केले नाही, उलट आलेल्या पथकातील सदस्य पत्रकार, समन्वयक यांना शिवीगाळ केली आणि दम भरला अखेर कार्यवाही म्हणून या पथकाने आपली यंत्रणा राबवली, कोरणा रोगाचे गांभीर्य माहित असलेल्या पथकातील सदस्य व पोलिसांनीही सबूरीचे घेतले, या सोळा पैकी काही जण दारू पिऊन तर्र झाले होते. पथकाने नमते घेऊन कारवाई पूर्ण केली असली तरी आपल्यापुढे पथक नमले अशा अविर्भावात हे परप्रांतीय वावरत आहेत दरम्यान हे लोक दारू व गांजा सारख्या अमली पदार्थ सेवन करत असून शासनाचे नियम न पाळता त्यांनी परिसरात दहशत निर्माण झाली आहे.