प्रतिनिधी/ म्हसवड
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी गेले 21 दिवसा पासुन म्हसवडकर नागरीक , पोलिस प्रशासन , म्हसवड पालिका व आरोग्य विभाग एक मेकांच्या हातात हात घालून लॉकडाऊनची अंमलबजावणीसाठी दिवस रात्र रस्त्यावर फिरुन लोकांना घरात बसा , खरेदी करताना, बोलताना योग्य डिस्टन्स पाळा, कामाशिवाय घरा बाहेर मोटारसायकल वा चालत येवू नका , मुंबई पूणे वा इतर ठिकाणावर आलेल्यांची माहिती कळवा आदी सुचना वारंवार देवून पोलिसांनी कधी काठी तर कधी उठबस्या, दंड केल्याने पोलिसांची व म्हसवडकर नागरीकांच्या भिती पेक्षा कोरोना या विषाणूंची दहशत म्हसवड काल पर्यंत होती मात्र आज बुधवारी अचानक असे काय झाले हजारो नागरीक रस्त्यावर उतरून मुख्यतः पेठेला एवढी गर्दी झाली की दिड तास पेठेत ट्रफिक जाम झाल्यावर पोलिसांना बोलवावे लागले याला जबाबदार कोण किराणा दुकानदार, भाजीपाला विकणारे, कि फळे विकणारे? खरेदी करताना ना दुकानदार ना ग्राहक सर्वांसाठी कोणीच डिस्टन्सन पाळत नव्हता तोंडावर रुमाल वा मास्क घालत नव्हता लॉकडाऊन व 144 चार नियम कोण पाळत नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्यां व्यापार्यांना जिल्हाधिकारी अद्दल घडवणार का असा सवाल नागरीक करत आहेत
गेले 21 दिवसा पासून जिह्यात कोठे हि एवढे कडक लॉकडाऊन पाळले नसेल असे लॉकडाऊन, व संचार बंदी जमाव बंदी म्हसवडकरांनी पाळली 21 दिवसांत 12 दिवस मेडिकल व हॉस्पीटल पेट्रोल पंप या तिनच अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्याचा म्हसवडकर जनतेने निर्णय घेतला व त्या प्रमाणे तो राबवला जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेचे बंधन हि म्हसवडकरांनी गावातील 30 हजार नागरीकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक सेवा सोडून दुकाने व्यावसाय बंद ठेवला होता सुरुवातीला चार दिवस भाजी मंडई बाजार तळावर दहा फुटांवर डिस्टन्स ठेवून बसवले मात्र तरी हि योग्य डिस्टन्स न पाळल्याने यात्रा पटांगण, चांदणी चौक, शिंगणापूर चौक येथे भाजी मंडई बसवली तरी हि नागरीक गर्दी करत होतेच शेवटी घरोघरी भाजीपाला व फळे विक्री करण्यात आली मात्र किराणा दुकानात माल खरेदी करताना पेठेतील व्यापारी भाजीपाला व फळ विक्रेते कोणच कोरोना या महाभयंकर विषाणूंची भिती बाळगत नसल्याचे आज दिसत होते 30 हजार लोकांच्या जिवीतास या तिनं व्यावसायीकांमुळे भिती निर्माण झाली आहे म्हसवड हे पालिकेचे शहर असल्याने या भागातील दहा ते पंधरा हजार नागरीक कामा धंद्यासाठी मुंबई पूणे आदी ठिकाणी होते मात्र लॉकडाऊन जाहिर झाल्यावर 31 मारली पर्यंत पा ते सात हजार लोक कोरोना बाधीत भागातुन म्हसवड व परिसरात दाखल झाले आहेत व सध्या होत आहेत जिह्यांच्या सिमा बंद असताना लोंढेच्या लोंढे नागरीक म्हसवड परिसरात येत होते त्यामुळे म्हसवडकर नागरीकांनी ठिक ठिकाणी रस्ते बंद करुन बांधीत गावावरून आलेल्यांना म्हसवड बंद केल्याने म्हसवडच्या लॉकडाऊनची जिह्यात चर्चा होती त्यामुळे पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील वा जिल्हाधिकारी या ही कधी म्हसवडला या काळात आल्या नव्हत्या एवढे यशस्वी लॉकडाऊन सुरु होते मात्र आज अचानक हजारो नागरीक किराणा भाजीपाला फळे खरेदीला बाहेर पडल्याने लॉकडाऊन संपले कि काय अशी परिस्थिती आज म्हसवड शहरातील रस्त्यांवरील गर्दीमुळे दिसत होती जिल्हाधिकारी यांनी जाहिर केलेल्या वेळेला किराणा दुकानदार भाजीपाला व फळे विकणारे केराची टोपली दाखवून 30 हजार लोकांना कोरोनाच्या पाशात हि गर्दी नेहत होती यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार त्यांनी म्हसवडला एकवेळ भेट देवून कारवाईचा बडगा उगारला तरच कोरोनासी सामना म्हसवडकर करु शकतील अन्यथा पोलिस व नगरपालिका व आरोग्य विभाग हाताची घडी तोंडावर बोट ठेवून बघत राहिली तर कोरोनि हा विषाणू म्हसवडकरांना केव्हा आपल्या कवेत घेईल हे हि कळणार नाही त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी एकवेळ म्हसवडला भेट देवून कारवाईचा बडगा उगारला तरच म्हसवडकर या विषाणू पासुन वाचू शकतील अशी परिस्थिती लॉकडाऊन सुरु असताना म्हसवडची झाली आहे








