सांगरुळ /प्रतिनिधी
सी .पी.आर च्या कोरोना कक्षात दि. ११ रोजी रात्री मृत्यू झालेल्या सांगरूळ ता .करवीर येथील ७२ वर्षे वृद्धाचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती सीपीआरच्या वैद्यकीय अधिकारी तेजस्विनी सांगरुळकर यांनी दिली
सांगरूळ मधील या वृद्धांना शनिवार दिनांक ११ एप्रिलला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. सीपीआरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी त्यांच्या घशातील स्त्राव घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते.
शनिवार रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा असल्या तपासणीसाठी पाठवल्यामुळे सांगरूळ सह परिसरात नागरिकांच्या म्हणून चिंतेचे वातावरण पसरले होते. त्यांचा कोरुना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे समजताच समृद्ध परिसरातील नागरिकांनी निश्वास सोडला.