ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईतील नायर रुग्णालयात एका कोरोना पॉझिटिव्ह महिलेने पहाटे 3.45 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. आग्रीपाडा पोलीसांनी याबाबतची माहिती दिली आहे.
याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यातअपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 29 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेवर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे 3.45 वाजता रुग्णालयाच्या बाथरूममध्ये तिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, कोरोनाच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आग्रीपाडा पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.









