प्रतिनिधी/अकोले
अकोले तालुक्यातील देवगाव परिसरात सात ते आठ महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जंगलात फेकून दिलेल्याचे आढळले आहे. हे अर्भक मृत अवस्थेत सापडले असून ते मारले की मृत झाल्यानंतर फेकून दिले हे अद्याप समजले नसून या बालकाचा बहुतांशी भाग पक्षांनी खाल्याचे निदर्शनास आले.
देवगावच्या परिसरात कावळ्यांनी जास्त कालवाकालव सुरू केल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर राजूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला व त्याचा पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीवर 318 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
देवगाव परिसरात गेल्या दोन दिवसांमध्ये एका दाट जंगलाच्या परिसरात कावळ्यांची जास्तच कावकाव सुरू झाली होती. त्यामुळे, तेथील पोलीस पाटील बालाजी भांगरे, सरपंच सचिन भांगरे यांना संशय आला होता. त्यांनी घटनेची शाहनिशा करण्यासाठी थेट जंगल गाठले असता त्यांना तेथे एक अर्भक दिसून आले. त्यांनी सदरची बाब राजूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नितीन पाटील यांना कळविली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट घटनास्थळ गाठले. काट्याची वाट तुडवत प्रचंड वास येत असतांना त्यांच्या पथकाने ते पक्षांनी चोची मारुन खाल्लेले निम्मे अर्भक ताब्यात घेतले. डॉक्टरांच्या समक्ष त्याचा पंचनामा झाला. अनैतिक संबंधातून या अर्भकास जंगलात फेकल्याची चर्चा आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








