प्रद्युम्नाच्या जन्मापासून आजवरची सारी हकिकत रतिने त्याला समजावून सांगितली.
तुझा शत्रु हा शंबरासुर । तव हननार्थ प्रयत्नपर ।
प्रसूतिगृहापासूनि सत्वर । आणूनि सागरिं निक्षेपित ।
यासि कळलिया तुझें नाम । तुज हा वधील तत्काळ अधम । देवां दानवां दुर्धर्म परम । मायानिगमशतवेत्ता।
अद्यापि जिंकिला नाहींच कोण्ही । परम मायावी कपटखाणी । ऐसिया तूंचि समराङ्गणीं । जाय वधूनि जननीपें ।
रति प्रद्युम्नाला पुढे म्हणते-हे पतिदेव! हा शंबरासूर तुझा शत्रू आहे. तू लहान बालक असतानाच तुझ्या मातेच्या प्रसूतीगृहातून तुला याने पळवले व समुद्रात फेकून दिले होते. त्याला जर कळले की त्याने समुद्रात फेकून देऊन बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, ते बालक आजही जिवंत आहे आणि ते बालक म्हणजे तूच आहेस तर तो तुला तात्काळ निश्चितच ठार मारील. हा देव दानवांपेक्षा बलाढय़ आहे आणि मायावी विद्येत अत्यंत प्रवीण आहे. आजपर्यंत याला कोणी पराभूत केलेले नाही. अशा या कपटी शंबरासूराचा रणांगणात वध करून तू आपल्या आईपाशी जा.
शंबर दुर्धर्ष कपटराशि । केंवि समरिं भिडवे त्यासीं ।
ऐसें न धरावें मानसीं । ऐक येविशीं गुज कथितें ।
त्रिजगज्जेता पंचबाण । तो तूं प्रद्युम्न कृष्णनंदन ।
तुझी अमोघ आंगवण । देतें स्मरोन तुज अवघी ।
अहल्यालावण्यबाणीं शक्र । शक्रपदवीपासूनि वक्र ।
केला त्रिजगीं श्यामवत्र । ऐसें विचित्र तव शौर्य ।
शंकरा भिल्लटीकटाक्षकाठी । भेदूनि भ्रमित फिरविला सृष्टी । गिरागौरवें हृदयपुटीं । शरें परमे÷ाr लोळविला ।
धीवरीनयनाब्जसायके । विंधूनि पराशर पाडिला तवकें । गाधिज नेला श्वानवेखें । तुवां मौनास्त्रें सुरलोका । मनुजवेशें रावणमृत्यु । हे तव पुष्पबाणाचें कृत्य । शुंभनिशुंभ पावले अंत । कीं सुंदोपसुंद तव शस्त्रीं । विष्णु वृंदावृत्ताच्या शरें । भेदितां विकळ जालीं गात्रें । येथें नंदाचीं राखिलीं ढोरें । तऱही न परिहरे हृच्छल्य । ब्रुहस्पतीसि भेदूनि शस्त्रीं । भरद्वाज केला औतथ्यक्षेत्रीं ।
उर्वशीच्या लावण्यशरिं । मैत्रावरुणि घटजात ।
मृगमैथुनावलोकबाणें। भेदितां विभाण्ड विकळ प्राणें । शृंगी ऋषीचें जन्मणें। हरिणीजठरिं तव महिमे । ऐसिया कुसुमबाणें धुरा। लोळविलिया थोरथोरा । शंबरदलनीं कोण दरारा । माया प्रचुरा तुजपासीं । मोहनास्त्रप्रमुख अस्त्रजाळें। जाणसी बहुविध मायापटळें । तो तूं बाळलीलेचे खोळे । माजि कोमळें केंवि लपसी । मोहनादि प्रचुर माया । स्मरोनि शंबरा पूर्णवैरिया । मारूनि मजला नेईं निलया । भेटवावया निज जनका।
मायावती प्रद्युम्नाला पुढे म्हणाली-शंबरासूर हा अत्यंत कपटी आहे, त्याला समरांगणात कसे भिडावे? असा प्रश्न तुझ्या मनात येत असेल तर मी एक गुह्य सांगते ते ऐक. स्वर्ग, मृत्यू व पाताळ या तिन्ही लोकांना जिंकणारा पंचबाण म्हणून विख्यात कामदेव तू स्वतः कृष्णनंदन प्रद्युम्न आहेस. तुझ्या अमोघ पराक्रमाचे स्मरण मी तुला आता करून देते.
Ad.. देवदत्त परुळेकर








