प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाला गो करण्यासाठी राज्य शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.सातारा जिह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बंद आहेत. दिलेल्या सुट्टीमध्ये ही शिक्षक, विध्यार्थी यांचे विविध अँप च्या माध्यमातून शैक्षणिक संवाद सुरु आहे.यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी आज जावली तालुक्यातील सुमारे 70 शिक्षकांशी मोबाईल ऍपद्वारे तब्बल 40 मिनिटे संवाद साधला.त्यामध्ये डाएट च्या अधिकायांचाही सहभाग होता.भागवत यांनी लॉक डाऊन मध्ये हि गुणवत्ता वाढीसाठी दहत्ग्हा अभ्यास घेणाया,पालक सम्पर्क ठेऊन मुलापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचणाया शिक्षकांचे कौतुक केले.आणि अभ्यासाबरोबरच पालक व विद्यार्थ्यांच्या मनातील कोरोना विषयीची भीती कमी करण्यासाठी त्यांना सूचना मार्गदर्शन करावे असे सूचीत केले.
जसा अधिकारी तसाच कारभार चालतो याचा अनेकदा प्रत्यय येतो.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी म्हणून शाळांना सुटय़ा दिलेल्या आहेत.घरीच रहा अशा सूचना शिक्षकांना आहेत.त्यानुसार सुट्टीमध्ये ही शाळेतील घरी असणारे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील नाते दृढ राहावे, याकरिता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने वारंवार सूचना दिल्या आहेत.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी स्वतः जावली तालुकयातील शिक्षकांच्याशी मोबाईल ऍपद्वारे कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेतला. 60 शिक्षक, अधिकारी ,डायटचे प्राचार्य संवादात सहभागी झाले होते.त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, डाएट प्राचार्य रामचंद्र कोरडे, अधिव्यख्याता राजश्री तिटकारे, गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे,
विस्तार अधिकारी कल्पना तोडरमल, हंबीरराव जगताप, विजयकुमार देशमुख, संपत धनवडे आदी सहभागी झाले होते व त्यांनीहि शिक्षकांना मार्गदर्शन केले. जित्सी मिट या ऍपच्या माध्यमातून हा संवाद साधण्यात आला. त्या चाळीस मिनिटात ब्रयाच अडचणीं, मुद्यांवर चर्चा झाली.त्यामध्ये प्रथम सर्वांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर जमा करून, व्हाट्सअपचे वर्गाचे अथवा शाळेचे ग्रुप केलेत व या माध्यमातून ?प्स लिंक, व्हिडिओज, ऑफलाइन टेस्ट , बीसीपीटी व्हिडिओज, शेअर करत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
हे करत असताना शिक्षकांनी एकमेकांना प्रेरणा द्यावी व येणाया अडचणी ग्रुपच्या माध्यमातून निसंकोचपणे सोडवून घ्याव्यात, आदींवर चर्चा झाली.गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी येणाया सुट्टीमध्ये विविध व्हीडिओ तयार करून व संकलित करून जावली पॅटर्नचा यु टय़ुब चॅनेल तयार करावा असे सुचविले. या उपक्रमात दुदुस्करवाडी शाळेचे उमेश मोरे, महिगाव शाळेचे दीपक फरांदे, दरेखुर्द शाळेचे अविनाश साबळे, कुडाळ शाळेचे संदीप किर्वे व रघूनाथ जाधव, मेढा शाळेचे समीर आगलावे, शंकर जांभळे,मिलन मुळे,नंदू केंजळे,राजेंद्र बोराटे,संदीप हिरवे,आदी तंत्रस्नेही 70 शिक्षक सहभागी झाले होते








