प्रतिनिधी / राजापूर
कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीचा जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. सदर व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नसली तरी मृत्यू नेमका कशाने झाला ते स्पष्ट झालेले नाही. यामुळे राजापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मंगलोर एक्सप्रेस मधून प्रवास केलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वाना होम कोरोंताईन करण्यात आले होते. यामध्ये राजापूर तालुक्यातील मोसम येथील व्यक्तीचा समावेश होता. या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी या व्यक्तीची तब्येत बिघडल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयत दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीचा उपचारादरम्यान शुक्रवारी मृत्यू झाला. त्यामुळे राजापूरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण हे कोरोनाशी संबंधित नाही. तरीही ही व्यक्ती होम कोरोंताईन असल्याने त्याच्यावर कोरोना बाधित व्यक्तिप्रमाणे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Previous Articleनिर्यात घटल्यास आशिया- रेस्टॉरेंट, वाहन-रियल्टी क्षेत्रांच्या बळकटीसाठी लागणार विलंब
Next Article आता संघर्ष नको, सहकार्य हवे









