वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
कोरोनाच्या वाढत्याप्रभावामुळे आगामी काही दिवस लॉकडाउन वाढण्याचे संकेत व्यक्त केले जात आहेत. या कालावधीत मात्र इंधनाची मागणी मोठय़ा प्रमाणत घटली आहे. मार्चमध्ये या मागणीत 20 टक्क्मयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. हाच अंदाज पुढे करुन चालू महिन्यातही ही मागणी जवळपास 40 टक्क्मयांनी कमी होण्याचे संकेत व्यक्त करण्यात येत आहेत.
या सर्वाचा इंधनाच्या किमतीवर मोठा प्रभाव पडत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इंडिया रेटिंग्सच्या माहितीनुसार मार्च महिन्यात इंधनाची मागणी 20 टक्क्मयांनी कमी झाली परंतु कपॅसिटी युटिलाझेशन 50 टक्क्मयांपर्यंत कमी झाला आहे. याचा सर्व फटका नफा कमाईसोबत रिफायनरीच्या ठराविक पातळीला बसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे जवळपास सर्वत्र व्यवहार ठप्प झाले आहेत. यातच देशात 16 मार्चपासून ऑनलाईन मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केलेला नाही. या काळात कच्च्या तेलाचे दर मात्र निचांकी पातळीवर आले आहे. त्यानंतरही इंधनाचे दर आहे तेच आहेत. तर एलपीजीच्या दरात बदल करण्यात आला आहे. करात वाढ केल्याच्या कारणामुळे काही राज्यांच्या पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत.
किमतीचा तपशील
पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलत असतात. आणि सकाळी सहा वाजता ते अपडेट केले जातात. दररोजचा दर माहिती करुन घेण्यासाठी एसएमएसची सुविधेचा वापर ग्राहकांना करता येणे शक्मय आहे. यात इंडियन ऑईलसाठी आणि बीपीसीएलसह एचपीसीएलनेही ग्राहकांना मोबाईल क्रमांक दिले आहेत.