एका आठवडय़ात तांदूळ 12 टक्क्मयांनी महागला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या संकटामुळे तांदूळ आणि गहू यांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आशियातील तांदळाच्या किमतीत तर मागील सात वर्षांचा उच्चांक गाठला आहे. तांदूळ एक्सपोर्टर्स असोसिएशन यांच्या माहितीनुसार तुकडा तांदळाची किमत 25 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत 12 टक्क्मयांनी वधारली आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या माहितीनुसार एप्रिल 2013 रोजी तांदळाच्या किमती सर्वाधिक वाढल्या होत्या. सध्या किमती वाढत आहेत, कारण पर्याप्त पुरवठय़ा अभावी तांदळाचा साठा करण्यात येत आहे. म्हणून बाजारपेठेत तांदळाचा तुटवडा झाला आहे. भारत आणि व्हीएतनामच्या एक्स्पोर्ट बंद झाल्याच्या कारणामुळे तांदळाच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज आहे.
आंतरराष्ट्रीय बटाटा सेंटरचे क्षेत्रतीय संचालक (आशिया),समरेंदु मोहंती यांनी म्हटले आहे, की, दुसऱया क्षेत्राप्रमाणे शेती क्षेत्रही संकटात आले आहे. लॉकडाउनच्या काळात ही समस्या आणखीन वाढणार असल्याचे संकेतही देण्यात आले आहेत.
शेती कामास कामगार नाहीत थायलंडमधील दुष्काळ पडल्यानंतर आणि आशिया आफ्रिकामधील क्यापाऱयांनी मागणी वाढविलल्याने तांदळाच्या किमती वधारल्या आहेत. भारत आणि दक्षिण आशियातील देशांच्या प्रमाणे जगातील दुसरे देश गहू, बटाटा, कापूस, फळ आणि भाजीपाला उत्पादनाचा हा हंगात आहे. परंतु यासाठी लागणारे मनुष्यबळ कमी आहे. कोरोनाचा वाढता विळखा थांबविण्यासाठी लॉकडाउन संपूर्ण देशात लागू केला आहे. यामुळे कामगारांची कमतरता भासत असल्याचेही यावेळी सांगितले आहे.









