वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडचा डरेन गॉ आणि पाकचा माजी कर्णधार व वासीम अक्रम यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आपल्या क्रिकेट कारकीर्दीत जपून ठेवलेल्या काही वस्तूंचा तसेच क्रिकेट साहित्याचा लिलाव करणार आहेत. या लिलावातून जमलेली रक्कम कोरोनाग्रस्तांसाठी दिली जाणार आहे.
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. ब्रिटनमधील कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलेल्या मदतनिधीला सहाय्य करण्यासाठी वॉ आणि वासीम अक्रम यांनी ही योजना आखली. पाकतर्फे कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वासीम अक्रम हा पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने 104 कसोटीत 414 तर 356 वनडे सामन्यात 502 बळी घेतले आहेत. इंग्लंडमधील क्रिकेटपटू या लिलावात सहभाग दर्शविणार आहेत. लंडनमध्ये स्वत:च्या मालकीच्या हॉटेलमध्ये रवि बोपाराने कोरोनाग्रस्तांसाठी मोफत चिकन वाटप सुरू केले आहे.