तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
एकीकडे जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. त्यामुळे सर्वत्र याकोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. तसेच यावर उपाय करण्यासाठी व गरिबांची मदत करण्यासाठी विविध दानशूर व्यक्ती समोर येत आहेत. दरम्यान आज शनिवारी सोलापुरातील बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक अजय कडू यांची कन्या आराध्या कडू हिने आपला वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री सहायता निधी, पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 10 हजार रक्कम दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सोलापूरच्या या चिमुकलीचे विशेष कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आराध्य कडू हिचे कौतूक करताना म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. अशा काळातच सोलापूरच्या आराध्य कडून हिने संयम दाखवत वाढदिवस साजरा न करता त्यासाठी लागणारा खर्च त्याची पूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेली आहे. यासाठी मी तिचे कौतुक करतो. अराध्या ही सात वर्षाची आहे, या लहान वयात लाड पुरवून घ्यायचे असतात. मुलं-मुली वाढदिवस साजरा करा असा हट्ट करीत असतात. मात्र या चिमुकलीने मोठे मन दाखवत वाढदिवस साजरा न करता निधी मुख्यमंत्री सहायताला देऊन जनतेसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. तसेच आगळावेगळा उदाहरणं महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. हीच महाराष्ट्राची ओळख आहे. ही समज सात वर्षाच्या मुली मध्ये आहे तर हे कोरोनाचे युद्ध आपण जिंकलो. तिला दीर्घायुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी आराध्याचे कौतुक केले.
म्हणून वाढदिवस साजरा केला नाही, गो कोरोना
सध्या जगभरात कोरोनाव्हायरस थैमान घालत आहे. त्यामुळे मी आराध्या अजय कडू माझा वाढदिवस साजरा न करता ती पूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता फंड साठी देत आहे. गो कोरोना
आराध्या कडू, सोलापूर
कोण आहे आराध्या
आराध्या कडू ही सोलापुरातील बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर अजय कडू यांची कन्या आहे. ते मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथील रहिवासी आहेत. सध्या सोलापुरात राहतात. आराध्या राजस्व नगर येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण घेत आहे. त्यांचे वडील अजय कडू हे नेहमी नवनवीन उपक्रम राबवत असतात. यापूर्वी बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून गरजूंना अन्य धान्य वाटप करण्यात आले आहे. वडिलांचा आदर्श घेत आराध्याने ही मदत केली आहे.
खारीचा वाटा असावा म्हणून मदत
कोरोना बचाव करण्यासाठी आपला खारीचा वाटा असावा म्हणून मुलीचा वाढदिवस साजरा न करता ती रक्कम मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दिली आहे. असेही अजय कडू यांनी सांगितले
Previous Articleसोलापुरातील मदरशाची जागा आयसोलेशन वार्डसाठी देणार
Next Article कोरोना जनजागृतीसाठी बार्शीत पोलिसांचा रूट मार्च








