प्रतिनिधी / मुंबई
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाने ५ लाख रुपये दिले आहेत. त्यामुळे कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी आता लालबागचा राजा सरसावला आहे.
लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आज ५ लाख रुपये सुपूर्द केले. याबाबत मंडळाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे. तसेच देश लवकरात लवकर कोरोनामुक्त होवो, असं साकडं लालबागच्या राजाला घातल्याचं म्हटलंय.
Previous Articleसप्ताहाच्या अंतिम दिवशीही बाजारात निराशा
Next Article इंदोरमध्ये समूह संसर्गाची भीती वाढली









