ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागात कोरोना बधितांची संख्या आज सायंकाळ अखेर 101 वर पोहचली आहे. पुण्यात 57, पिंपरी चिंचवड 14, सातारा 3, सांगली 25 आणि कोल्हापूरात 2 अशी रुग्णांची संख्या आहे. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील 2018 नमुमे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी 1878 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून 140 जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. 1777 नमुने निगेटीव्ह आहेत व 101 नमुने पॉझिटीव्ह आहेत. तर 18 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर आजपर्यंत विभागामधील 15,61,992 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 72,87,291 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 490 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.








