ऑनलाईन टीम / शिलॉंग :
आरोग्यासाठी आवश्यक म्हणून दारूच्या होम डिलिव्हरीला मेघालय सरकारने लॉकडाऊन काळातही तात्पुरती परवानगी दिली आहे. गरजू ग्राहकांना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारावर दारुची होम डिलिव्हरी केली जाणार आहे.
गरजू नागरिकांना डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तरच दारूची होम डिलिव्हरी मिळेल, असे मेघालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. १४ एप्रिलपर्यंतच अशा प्रकारे दारूची होम डिलिव्हरी केली जाईल. केरळमध्येही यापूर्वी असाच निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे मेघालय हे दारूची होम डिलिव्हरी करणारे दुसरे राज्य ठरले आहे. केरळातील डॉक्टरांनी मात्र, दारुचे प्रिस्क्रिप्शन देण्यासाठी स्पष्ट नकार देत थेट या निर्णयावर बहिष्कारच टाकला आहे.