पुलाची शिरोली / प्रतिनिधी
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या गावात सुमारे चारशे नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. यापैकी शिरोली गावातील इस्लामपूर येथून आलेली एक महिलेला आज, रविवारी सकाळी कोल्हापूरच्या सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँन्ड्रूस यांनी दिली. यावेळी त्यांनी नागरीकांनी भिती बाळगू नये पण दक्षता घ्यावी असे सांगितले.
शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिरोली, नागाव, मौजे वडगाव, टोप, कासारवाडी, संभापूर व हालोंडी आदी गावांचा समावेश होतो. यातील काही गावामध्ये दुबई, मुंबई, पुणे, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल अशा अनेक ठिकाणाहून सुमारे चारशे लोक आले आहेत. अशा सर्व लोकांच्या नोंद संबंधित ग्रामपंचायत, पोलीस ठाणे व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या कडे आहेत. ते सर्व लोक सद्या होम क्वारंटाईनमध्ये आहेत. संबंधित अधिकारी त्यांच्या संपर्कात आहेत.
पण शनिवारी रात्री इस्लामपूर ता. वाळवा येथून एक महिला आली होती. ही माहीत प्रशासनाला समजली. त्यांनी तत्काळ रविवारी सकाळी सहाच्या सुमारास त्या महिलेला ताब्यात घेऊन सरकारी दवाखान्यात दाखल केले आहे. हि बातमी गावात वार्यासारखी पसरली असून एकच खळबळ उडाली आहे.
Previous Articleकोल्हापूर : खोटे सांगू नका, कानाखाली लावेन!, आ. चंद्रकांत जाधव संतप्त : मॉलच्या व्यवस्थापकाची केली कानउघडणी
Next Article मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी साधलेला संवाद..









