तरुण भारत संवाद प्रतिनिधी/पंढरपूर
कोरोना व्हायरस या आजारासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यांचे आराध्य दैवत असणा-या विठुरायांने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 1 कोटी रूपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असल्यांची माहिती मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठठल जोशी यांनी दिली आहे.
सध्या देशासह, राज्यभर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक उपाययोजना होत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या श्री विठठल रूक्मिणी मंदिरे समितीने 1 कोटी रूपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे निश्चित केले आहे. याशिवाय 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रदद करण्यात आली आहे. तसेच विठुरायांचे मंदिर देखिल 14 एप्रिलपर्यत बंद राहणार आहे. त्यामुळे पंढरीत कुठल्याही भाविकांनी येऊ नये. असे आवाहन यनिमित्ताने करण्यात आले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाउन आहे. पंढरपूरात तसेच राज्यात देखिल कडेकोट बंद आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर समितीने पंढरपूरातील प्रशासनास मेडीकल किट हे नागरीकांच्या सुविधेसाठी पुरविले आहे.तसेच शहरातील असंख्य बेघर आणि मागतक-यांना देखिल दररोज फूड पॅकेटस देण्याचे काम होत आहे.
मदत देण्याचा हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तर समितीचे सदस्य आ.राम कदम, आ. सुजितसिंह ठाकुर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, भास्करगिरी महाराज, दिनेशकुमार कदम, माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आदींनी या निर्णयास सहमती दर्शवली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









