प्रतिनिधी/ पर्वरी
कोरोना विषाणुंशी झूंज देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून पर्वरी बेती, वेरे व अन्य परिसरातील सर्व व्यवहार बंद ठेऊन आणि घराबाहेर न पडता कडकडीत बंद पाळला.
नेहमीच वाहनांच्या गर्दीने गजबजलेली पणजी, पर्वरी, म्हापसा मार्गावरील वाहतूक बंद होती. महामार्गावर एखादी रुग्णवाहिका व अत्यावश्यक कामासाठी धावणाऱया किरकोळ वाहनाशिवाय अन्य एकही वाहन रस्त्यावर दिसत नव्हते.
पर्वरी परिसरातील तोर्ड साल्वादोर द मुन्द धरून अन्य सर्व भागातील एकानएक दुकाने बंद ठेऊन लोकांनी कोरोना पासून देश वाचविण्यासाठी आपल्या परिने सहकार्य केले.
पर्वरीचे पोलीस उपअधीक्षक एडवीन कुलासो, निरीक्षक निनाद देऊलकर, उपनिरीक्षक चंद्रकांत गावस व अन्य पोलीस कर्मचाऱयांनी वाहतुकीवर कडक नजर ठेवली. वाहतूक पोलिसांच्या वाहनांची गस्त महामार्गावर चालू होती.