ऑनलाईन टीम / मुंबई :
जगात कोरोनाचा कहर सुरू असताना शेअर बाजारात पण याचा परिणाम होताना दिसत आहे. सोमवारी बाजार उघडताच निर्देशांक 2900 अंकांनी कोसळला. राष्ट्रीय शेअर बाजारात 800 अंकांची घसरण झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले. निर्देशांक 10 टक्क्यांनी कोसळला असून लोअर सर्किट बाजारात पाऊण तासासाठी टेडिंग रोखण्यात आले आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण देशभरात 31 मार्च पर्यंत लॉक डाऊन करण्यात आले आहे. मात्र तरीही देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आठवडाभरात दुसऱयांदा बाजाराला लोअर सर्किट लागले असून टेडिंग थांबवण्यात आले आहे.