ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, अनेकजणांनी हे लॉकडाऊन गांभीर्याने घेतलेले दिसत नाही आहे. ही चिंतेची बाब आाहे. कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाऊन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा ट्विट द्वारे केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, बरेच लोक अद्यापही लॉकडाऊन गांभीर्याने घेत नाहीत. कृपा करून स्वतः ला वाचवा, आपल्या कुटुंबास वाचवा, सूचनांचे गंभीरपणे पालन करा. राज्य सरकारांनी विनंत्या व कायदे पाळावेत अशी मी विनंती करतो.
दरम्यान, पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. हा जनता कर्फ्यू 31 मार्च पर्यंत वाढवण्यात आल्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने रविवारीच दिला. तरीही मुंबईतल्या रस्त्यांवर खासगी वाहनांमधून येणाऱया मुंबईकरांची संख्या वाढलेली दिसून आली. त्यामुळे मोदींनी पुन्हा एकदा ट्विट करुन लॉकडाऊन गांभीर्याने घ्या असं आवाहन केलं आहे.