ग्राहकांना दोनच आयफोन खरेदीचा पर्याय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकन दिग्गज टेक कंपनी ऍपलने आयफोनच्या ऑनलाईन खरेदीवर मोठा प्रतिबंध लागू केला असून ग्राहकांना आता मर्यादीतच आयफोन खरेदीचा पर्याय देण्यात येणार आहे. म्हणजे आता दोनपेक्षा जास्त आयफोन खरेदीचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध होणार नसल्याचे ऍपलने सांगितले आहे. ही आयफोन खरेदी अमेरिका, चीनसोबत अन्य देशातील ग्राहकांना हा पर्याय ठेवण्यात येणार आहे. हा नवीन नियम शुक्रवारपासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. जगात कोरोनाचे सुरु असणारे थैमानामुळे ऍपल कंपनीने चीनच्या बाहेरील सर्व प्रत्येक्ष खरेदी करण्याची स्टोर व उत्पादन बंद करण्यात आले आहे.
2007 मध्ये प्रथमच मर्यादा लागू
आयफोन 2007 मध्ये बाजारात दाखल करण्यात आल्यानंतर पहिल्यादाच आयफोन खरेदीवर मर्यादा आकारण्यात आली आहे. ऍपलने हा निर्णय आयफोन पुनर्विक्रीला रोखण्याच्या उद्देशाने घेतला आहे. देशातील ऍपलच्या वेबसाईटवर ड्रॉप-डाउनच्या मेनूच्या आधारे ग्राहकांना एकाच मॉडेलचे दोनपेक्षा अधिक आयफोन घेण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
प्रमुख देशाचा समावेश
जगातील विविध देशांपैकी प्रामुख्याने चीन, हाँगकाँग, तैवाण आणि सिंगापूरमदील आयफोन लिस्टिंगच्या आधारे ग्राहकांना सूचना देण्यात आली आहे, की त्यांनी प्रत्येक ऑर्डर दोनपेक्षा जादा आयफोनसाठी करु शकणार नाहीत. परंतु यावर कंपनीने कोणतीही अन्य प्रतिक्रीया दिलेली नाही.
नुकसानीचे संकेत
कोरोनाचा वाढता प्रसार पाहून कंपनीचे उत्पन्न मिळवण्याचे ध्येय मागे पडणार असल्याचे अनुमान असून यामुळे कंपनीच्या उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे अनुमान ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी यावेळी व्यक्त केले आहे.