वृत्तसंस्था / मुंबई
आयसीआयसीआय लोम्बार्ड या भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बिगर-आयुर्विमा कंपनीने एक खास ‘कोविड-19 संरक्षण योजना’ आणली आहे. ही पॉलिसी गटविमा स्वरूपात लाँच करण्यात आली आहे. या संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर, ही पॉलिसी कोविड-19चे निदान ‘पॉझिटिव्ह’ आल्यास 100 टक्के इन्शुअर्ड रक्कम पॉलिसीधारकाला देईल. यात विमाधारकाला रुग्णालयात दाखल करण्याचा खर्च आला की नाही हा निकष लावला जाणार नाही. आपल्या ‘निभाए वादें’ या घोषवाक्मयाशी सुसंगती राखत ग्राहकांसाठी नवीन योजनांचा पाया उद्योगक्षेत्रात सर्वप्रथम घालण्याच्या प्रयत्नांतील पुढील पाऊल म्हणजे हे नवे उत्पादन होय.
पॉलिसीधारकाने कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त केंद्रात केलेली कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली, तर कंपनी त्याला इन्शुअर केलेली संपूर्ण रक्कम देईल. पॉलिसीच्या कालावधीतील कोविड-19च्या पहिल्या निदानानंतर 14 दिवसांचा प्रारंभिक प्रतीक्षाकाल पार पडला की पॉलिसीधारकाला हे पैसे एकरकमी दिले जातील. या संरक्षणाची व्याप्ती भारताच्या भौगोलिक सीमांमध्ये असेल आणि ही पॉलिसी केवळ भारतीय नागरिकांपुरतीच मर्यादित आहे.
या आरोग्य संरक्षणाचा हप्ता परवडण्याजोगा म्हणजेच 149 रुपयांचा आहे आणि इन्शुअर्ड रक्कम 25,000 रुपये आहे. यामध्ये आरोग्य सहाय्य आणि चॅट/व्हर्चुअल सहाय्य, टेली-कन्सल्टेशन आणि रुग्णवाहिकेबाबतचे सहाय्य हे अतिरिक्त लाभ उत्पादनाचा भाग म्हणून दिले जाणार आहेत. कोविड-19 विमा संरक्षणाचा अनोखा लाभ 18 ते 75 या वयोगटातील सर्व व्यक्तींना देण्यात येईल. या विषाणूचा सर्वाधिक परिणाम वयोवृद्धांवर होत आहे.