फर्निचर, पडदे आदीसाठी लागतं ते कापड. अगदी पलंगपोस, अभ्रे याकरीता कापडाची निवड केली जाते. अशा प्रकारच्या फर्निशिंग्जसाठी कॉटनचं कापड उत्तम ठरतं. आरामदायी आणि देखभालीसाठी उपयुक्त असं हे कापड म्हणता येईल.
आ रामदायी कापडात ज्या प्रकारचं कापड मोडतं ते आहे कॉटन.
घरातले पडदे, फर्निचरवरचे कव्हर हे कापडी घेतलेले उत्तम असते. या कापडी आवरणाचा फीलही खूप छान असतो. कॉटनची निवड ही फर्निशिंग्जसाठी रास्त ठरते.
कॉटनचे सुमारे 40 प्रकार आहेत पण त्यातले 4 च लोकप्रिय आहेत.आता त्यातले दोनच प्रकार वापरले जातात. बाजारातील प्रकाराचा विचार करता चकाकणाऱया कापडाने याआधीच सजावटीत आपली मोहीनी घातली आहे. सजावटीत फर्निशिंग्ज करताना कॉटन हे साधं, एथनिक आणि सहजपणे देखभालीसाठी उपयुक्त असं समजलं जातं. एकतर शुद्ध कॉटनचं कापड येतं नाहीतर मिश्र सुतासमवेत.
कॉटन कापड हे आरामदायी आणि कुल फील देतं.
कॉटन कापडाची देखभाल फारशी कठीण नसते. तसेच दर्जाही चांगला असतो.
पॅटर्न आणि रंगांमध्ये साधर्म्य राखून कॉटनचे कापड निवडता येते.
हे कॉटनचे कापड वापरण्याचा एक फायदा म्हणजे ते घरातल्या इतर गोष्टींशीही जुळवून घेतं. सजावटीत कॉटनचे फर्निशिंग्ज वापरताना माती, विटा, चिकणमाती, सिरॅमिक, केन, बांबू, ज्युटच्या ऍक्सेसरीज, फर्निचर, लाइट फिटींग्ज आदी गोष्टी बऱयापैकी सूट होतात.
ज्युट, केन, बांबू यातील विविध पोतांचा वापर कॉटनबरोबर कुशन कव्हर्स, टेबल लिननसाठी करता येतो.
फ्लोरल डिझाइनचा भौमितीक पोताचा छान वापर करून घेता येतो. सजावटीत अभ्रे निवडताना अशा प्रकारचे निवडणे सुंदर दिसते. गडद रंगाच्या छटांचे मिश्रण आणि प्लेन कापडाच्या फर्निशिंग्जबरोबर साधर्म्य राखता येते.
लेससहचे कापड फर्निशिंग्जसाठी वापरल्यास दिसायला खूपच सुंदर दिसते. 100 टक्के शुद्ध कॉटनचे कापड असल्यास अधिक चांगलं असतं.
कॉटनचे कापड हे सहसा उजळत्या रंगाचं घेता येतं आणि ते असतंही तलम.
फायदे
- कापड तलम आणि आरामदायी असतं.
- हे कापड वॉशिंग मशीनमध्ये धुता येतं.
- कापड बरंच काही शोषून घेण्याची क्षमता बाळगतं.
- रंगही त्यावर उठून दिसतात.
- कापड धुतल्यानंतर वाळतेही लवकर.