नवी दिल्ली
नागरिकत्व सुधारणा कायदा तसेच एनआरसीवरून होत असलेल्या निदर्शनांदरम्यान केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत महत्त्वाची माहिती दिली आहे. आसाममधील स्थानबद्धता केंद्रांमध्ये 802 जण असल्याचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले आहे. देशभरात एनआरसी लागू करण्यासंबंधी अद्याप निर्णय झाला नसल्याचे राय म्हणाले.
2015 मध्ये भारत-बांगलादेश यांच्यात झालेल्या सीमा करारानुसार 14868 बांगलादेशींना नागरिकत्व देण्यात आल्याचे राय यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. आसाममध्ये 2019 मध्येच एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.