स्त्री ही एक अबला आहे. तिच्या हातून काही होत नाही अशी समजूत पूर्वीच्या लोकांची होती. घर सांभाळणे, मुलांना मोठे करणे, उष्टी काढणे, कोठे बाहेर जाणे नाही. बाहेरचे जग कसे आहे हे तिला माहितच नव्हते. घर, नवरा, मूल, काम हेच तिचं जग होत. पण हीच स्त्री आज अतिशय पुढे गेली आहे.
याला कारण महात्मा जोतिराव फुले व त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले. महात्मा फुलेंना बायकांच्यावर केलेला अन्याय सहन झाला नाही. त्या अबला राहणं, अशिक्षित राहणं योग्य वाटलं नाही. पूर्वी मुलींना शिक्षण देत नसत. महात्मा फुलेंनी शिक्षणाची सुरवात आपल्या घरातून केली. आपल्या पत्नीला सुशिक्षित करायचे ठरविले. सावित्रीबाईही डगमगल्या नाहीत. लोकांना न जुमानता त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. नंतर मुलींची शाळा काढली. हे कर्मट वृत्तीच्या लोकांना आवडले नाही. त्यावेळी त्यांच्या अंगावर लोक अंडी, टोमॅटो, दगड फेकत असत. परंतु या दोघांनीही न घाबरता मुलींना शिकविण्याचे कार्य चालूच ठेवले. त्यामध्ये त्यांना यश आले. मुली सुशिक्षित होऊ लागल्या.
मुलगी आईच्या घरी सुसंस्कारात लहानाची मोठी होते. तिच्यावर बंधन असते. पूर्ण स्वातंत्र्य असत नाही. पण मुलाला मात्र असतं, कारण तो मुलगा घराण्याचा वंश चालवणारा असतो. असा त्रास सगळय़ाच घरातून मुलींना असत नाही. कित्येक घरातून मुलगा व मुलगी यामध्ये फरक न दाखवता वागवले जाते. मुलगी लग्न करून सासरी आली की तिच्यावरील बंधने कमी होत नाहीत. तर ती आणखी वाढतात. नवरा, सासू, सासरे, दीर, नणंद या साऱयांच्या मनाचा विचार करून त्यांच्या आवडी निवडी सांभाळून घरात वावरावं लागतं.
घरी पुरूषाने का कामे करू नये. पाणी भरणे, झाडणे, मुलांना अंघोळ घालणे, मुलांचा अभ्यास घेणे, विस्कटलेल्या वस्तू नीटनेटक्मया ठेवणे, डय़ुटीवर जाताना आपल्या वस्तू आपण काळजीपूर्वक घेणे, स्त्रीशी चार शब्द प्रेमाणे बोलले पाहिजे. चार प्रेमाच्या शब्दामुळे स्त्रीचा थकवा निघून जातो. स्त्री परत उत्साही होते. पण नेमके हेच काही काही पुरूष करत नाहीत. पुरूषांनी स्त्रीला तीचा सन्मान दिलाच पाहिजे. तिला लाचार, गरीब गाय समजू नये. हीच गाय शिंग हलवून ढोसायला सुरवात केली की अवस्था विचित्र होईल. वामनराव पै म्हणतात, ‘घरची स्त्री ही घरची लक्ष्मी असते’ तिला जास्त दुखवू नये. तरच घराची भरभराट होऊन घरी लक्ष्मी वास करते व शांती नांदते घर म्हणजे एक नंदनवन असलं पाहिजे. घरात हास्य विनोद होऊन घर हासत खेळत राहीलं पाहिजे. म्हणतात ना, ‘घर असावे घरासारखे । नकोत नुसत्या भिंती’
एका स्त्रीमागे पर्वताप्रमाणे उभारणारा तिचा नवराच असतो. मी फक्त पुरूषाला दोष देत नाही, की टीकाही करत नाही. स्त्रीनेही पुरूषाशी प्रेमान वागले पाहिजे. अलट उत्तर न देता त्याच्याशी हसत मुखाने बोललं पाहिजे. त्याच्या सुखदुःखात आपण सहभागी झालं पाहिजे. स्त्रीनेही नवऱयाचा मान त्याला दिलाच पाहिजे. दोघांनी मिळून हसत मुखाने संसाराचा रथ ओढून यशस्वी झाले पाहिजे. महागाईच्या दिवसात पुरूष तरी एकटा काय करणार? म्हणून स्त्रीनेही आपण नोकरी किंवा गृहोद्योग करून संसाराला हातभार लावला पाहिजे.
सुरेखा जांबोटकर
गोकुळनगर, बेळगाव









