ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपिया जिह्यात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून अजूनही काही दहशतवादी या भागात लपून बसल्याची माहिती मिळतेय.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला दक्षिण काश्मीरच्या रेबान भागात दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर इथं घेराव घालत सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. दरम्यान, या चकमकीत सुरक्षादलाचं कोणतंही नुकसान झाले नाहीये. मात्र, अजूनही शोपिया भागात चकमक सुरू आहे.
या दरम्यान दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलावर गोळीबार सुरू करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून प्रत्यूत्तर देण्यात आलं आणि चकमकीला सुरूवात झाली. या भागात अजूनही एक दहशतवादी लपून बसलाय. ऑपरेशन सुरू असल्यानं अफवा पसरू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून शोपिया भागात इंटरनेट बंद करण्यात आलंय. दरम्यान हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही.