‘हिरोपंती’ चित्रपटातून अभिनेता टायगर श्रॉफने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. तर मुख्य अभिनेत्री म्हणून अभिनेत्री क्रिती सॅनोन झळकली होती. हा चित्रपट बॉक्सऑफीसवर गाजला. यात क्रितीऐवजी दिशा पाटनी दिसणार होती. पण काही कारणास्तव हा चित्रपट ती करू शकली नाही. दिशाचाही हाच पदार्पणाचा चित्रपट ठरणार होता. पण आता या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘हिरोपंती 2’मध्ये टायगर श्रॉफसोबत दिशा पाटनी झळकणार आहे. टायगर व दिशा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. दिशाने टायगरसोबत ‘बाघी 2’ या चित्रपटात काम केले होते. तर ‘बाघी 3’ मध्ये तिने आयटम साँग केले होते. सध्या दिशाकडे खूप चांगले चित्रपट आहेत. महत्त्वाचा चित्रपट म्हणजे सलमान खानचा ‘राधे’. यामध्ये ती महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी सलमानच्या ‘भारत’ या चित्रपटात तिने आयटम साँग केले होते. ‘मलंग’ या चित्रपटामुळेही ती सध्या फॉर्मात आहे. तर केटीना या एकता कपूरच्या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









