साहित्यः
1 मध्यम आकाराचे पिकलेले खरबूज, अर्धा लीटर दूध, चवीनुसार साखर, 1 वेलची, आवश्यकतेनुसार बर्फाचे छोटे तुकडे
कृतीः
प्रथम खरबूज धुवून त्याच्या वरील आवरण काढावे. त्यातील बी देखील काढावी. नंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. आता हे तुकडे ज्यूसरमध्ये घालावेत. त्यातच साखर आणि सोललेली वेलची टाकून मिश्रण बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात गार दूध ओतून मिश्रण परत एकदा फेटून घ्यावे. आता त्यात बर्फाचे छोटे तुकडे घालून मिश्रण परत एकदा मिक्सरला लावून घ्यावे. आता तयार गार खरबूज शेक ग्लासमध्ये ओतून पिण्यास द्यावे.
टीपः खरबजू शेक शिल्लक राहिल्यास त्यात थोडीशी दुधाची मलई आणि दोन ते तीन काजू तुकडे टाकून कुल्फीसाठी डीप फ्रिजरमध्ये ठेवावे. खरबजू कुल्फीही छान लागते. खरबूज शेक बनविताना साखरेऐवजी मधाचा वापर केला तरी शेक चविष्ट होईल.