सध्याच्या लग्नांमध्ये मेहंदी, संगीत सोहळ्यांनाही खूप महत्त्व आलं आहे. मेहंदी, संगीत सोहळ्यांमध्ये खूप धमाल येते. या विशेष प्रसंगी वैविध्यपूर्ण पेहराव करता येईल. अशाच काही पेहरावांविषयी…
- सध्या रफल साडीची प्रचंड क्रेझ आहे. रफल साडी मेहंदी, संगीत, प्री वेडिंग पार्टी अशा प्रसंगी शोभून दिसते. आधुनिक आणि स्टायलिश लूकसाठी एखादी रफल साडी कॅरी करा.
- शरारा साडी हा पर्यायही तुम्ही ट्राय करू शकता. पँट साडीबद्दल तुम्ही ऐकलं असेल. साडीसोबत पँटऐवजी शरारा घाला. गडद रंगाच्या शरार्याची निवड करा. त्यावर सिल्कची प्लेन साडी नेसता येईल.
- पेप्लम टॉप आणि धोती पँट असं कॉम्बिनेशन करता येईल. हा पेहराव खूपच आरामदायी आहे. संगीत किंवा मेहंदी अशा दोन्ही सोहळ्यांमध्ये हा पेहराव खुलून दिसतो.
- प्री वेडिंग पार्टीला जंपसूटही चालून जाईल. गडद किंवा फिकट यापैकी कोणत्याही रंगचे जंपसूट चालून जातील. जंपसूटवर हाफ लाँग जॅकेट घाला. तुम्ही खूप सुंदर दिसाल.
- ड्रेप ड्रेस हा पर्यायही तुमच्यासाठी आहे. मेहंदी, संगीत यापैकी कोणत्याही प्रसंगात ड्रेप ड्रेस घालता येईल.