ऑनलाईन टीम / चेन्नई :
कुख्यात चंदनतस्कर वीरप्पन यांची मोठी मुलगी ऍड. विद्याराणी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मोदींच्या लोककल्याणकारी योजनामुळे प्रभावित होऊन त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिह्यातील एका कार्यक्रमात भाजपचे माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. विरप्पन यांना दोन मुली आहेत. विद्यारणी या मोठय़ा असून, त्या वकील आहेत.
भाजपप्रवेशाबाबत विद्याराणी म्हणाल्या, कृष्णागिरीमध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी मागील वर्षापासून मी शाळा चालवित आहे. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांचा विकास करायचा आहे. दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मी भेटले होते. तेव्हा त्यांनी भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावर मी विचार करत होते. त्यानंतर मोदींच्या लोककल्याणकारी योजनामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला.
विद्याराणी यांच्या आई मुथ्थुलक्ष्मी या देखील तामिळनाडूच्या एका सेलमध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत.









