वार्ताहर / केळघर :
धनापूर चंदौली (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या राष्ट्रीय आंतरशालेय तिरंदाजी स्पर्धेत साताऱयातील पोदार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी तनिश चंद्रहार पवार याने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करताना 14 वर्षाखालील वयोगटात वैयक्तिक गटात व सांघिक गटात प्रत्येकी एक रौप्य पदक मिळवले आहे. त्याला प्रशिक्षक प्रवीण सावंत यांचे मागर्दशर्न लाभले आहे. तनिश याने जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेतले आहे. तनिशला पोदारचे प्राचार्य श्री. सिंग, क्रीडाशिक्षिका सुमेधा साबळे यांनी मागर्दशर्न केले.
तनिशने देशपातळीवर मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, किडगावच्या सरपंच अर्चना घोलप, उपसरपंच विठ्ठल इंगवले, दृष्टी आर्चरी ऍकेडमी, किडगाव ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.