नवी दिल्ली
मागील 3 वर्षांमध्ये 3727 बांगलादेशी घुसखोरांना देशातून हाकलण्यात आल्याची माहिती गृहमंत्रालयाने राज्यसभेत बुधवारी दिली आहे. 2017-19 या कालावधीत बांगलादेशातून आलेले 1,10,642 नागरिक व्हिसाची मुदत संपूनही भारतात वास्तव्य करत आहेत. अवैध बांगलादेशी देशाच्या विविध भागांमध्ये राहत असल्याचे गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले आहे.
2017 ते 27 जानेवारी 2020 पर्यंत 3727 अवैध बांगलादेशींना देशातून बाहेर काढण्यात आल्याचे राय म्हणाले.
हिंसक विद्यार्थी आणि जमावाचा पाठलाग करत पोलीस विद्यापीठ परिसरात दाखल झाले होते. विद्यापीठात राहणाऱया विद्यार्थ्यांना वाचविण्याची गरज असल्यानेच पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे विधान राय यांनी केले आहे.









