नवी दिल्ली
किया मोटर्स इंडियाची निव्वळ वाहन विक्री जानेवारीत 15,450 युनिट्वर राहिली आहे. कंपनीने मागील महिन्यात सेल्टॉसच्या 15 हजार आणि कार्निवलच्या 450 गाडय़ा डीलर्सकडे पाठविण्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 15,450 वाहनांच्या विक्रीसोबत कंपनीने देशातील प्रवासी वाहन विक्रीत चौथ्या स्थानी राहिली आहे. सेल्टॉस मॉडेल ऑगस्ट 2019 मध्ये सादर केले आहे. त्याच्यानंतर मागील महिन्यात त्यांची सर्वाधिक विक्री झाली आहे. तर मागील पाच महिन्यात कंपनीने 60,494 सेल्टास विकल्या आहेत. त्या पाठोपाठ किया मोटर्स इंडिया आपले दुसरे वाहन कार्निवल पाच फेब्रुवारी रोजी वाहन मेळय़ात सादर करणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार त्यांचे बुकिंगच्या पहिल्या दिवशीच 21 जानेवारी 2020 रोजी 1,410 कार बुकिंग झाले आहे.








