ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेडून भारतातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी 9 फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, या मोर्चासाठी मनसेकडून राणी बाग ते आझाद मैदान व गिरगाव चौपटी ते आझाद मैदान हे दोन मार्ग सूचवण्यात आले होते. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलीस खात्याने मोर्चाच्या या मार्गाला परवानगी नाकारली आहे.
पोलीसांनी राणी बाग ते आझाद मैदान या मार्गाचा वापर न करण्याची सूचना मनसे नेत्यांना केली. व मनसेच्या महामोर्चासाठी नवा मार्ग आखून दिलाय. आता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार असून तो आझाद मैदानावर जाणार आहे. तिथे राज ठाकरे हे मोर्चाला संबोधित करणार आहेत.