मुंबईत गिरण्या बंद पडल्यानंतर महिलांसमोर जेवण बनविणे हे एकमेव कौशल्य उरले होते. याच कौशल्यावर 1975 मध्ये ‘अन्नपूर्णा महिला मंडळ’ स्थापन करून खानावळ सुरू करण्यात आली. त्यानंतर झोपडपट्टीतील महिलांसाठी बचत सुरू केली. खासगी सावराकांकडून केली जाणारी लूट थांबविण्यासाठी हा गट तयार झाला. 5- 10 रुपयांच्या बचतीतून आज अन्नपूर्णाची 250 कोटींची उलाढाल झाली. महिलांनी स्वत: बचत करून अन्नपूर्णा उभी केली केली, अशी माहिती अन्नपूर्णा समुहाच्या प्रमुख कॉमेड मेधा सामंत यांनी दिली.
साहित्य संमेलनाच्या तिसऱया सत्रात त्या बोलत होत्या. त्यांनी आपल्या मनोगतातून अन्नपूर्णा या महिला संघटनेचे पैलू उलगडून दाखविले. त्या पुढे म्हणाल्या, बँकींग क्षेत्रात काम करत असताना, घरी येता जाता भाजी विकणाऱया बायका दिसायच्या. त्यांच्याकडून खासगी सावकार असणारा अण्णा प्रत्येक दिवशी पैसे घेऊन जायचा, हे पाहिल्यावर आपण या महिलांसाठी काहीतरी करावे, या विचारामधून गट स्थापन करण्याची कल्पना सूचली. बँका राष्ट्रीयकृत झाल्या पण या भाजीवाल्यांना कर्जे देण्यास टाळाटाळ करत होत्या. त्यामुळे आपणच गट स्थापन करून त्यांना मदत करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
10 महिलांचा गट तयार करून बचतीची सुरुवात केली. त्या महिलांनी घेतलेली रक्कम व्याजासह परत केली. त्यातून अन्नपूर्णा महिला पेडिट को. ऑप. सोसायटीची निर्मिती झाली. आज अन्नपूर्णाकडे 100 कोटींच्या बचती, 25 हजार पेन्शनधारक आहेत. सध्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









