एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
महादेव रोड, कंग्राळी खुर्द येथील एक विवाहिता गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. यासंबंधी तिच्या पतीने एपीएमसी पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.
काजल गजानन मडिवाळ (वय 20) असे तिचे नाव आहे. 24 जानेवारी रोजी सायंकाळी 4 पासून ती बेपत्ता झाली आहे. 31 जानेवारी रोजी पती गजानन मडिवाळने पोलिसांत फिर्याद दिली असून यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
5.1 फूट उंची, अंगाने सडपातळ, गहू वर्ण, गोल चेहरा, असे तिचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना तिने निळय़ा रंगाचे चुडीदार परिधान केला होता. काजल कन्नड व मराठी भाषा बोलते. या विवाहितेविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405250 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









