प्रतिनिधी / कुरूंदवाड
बाप-मुलाच्या भांडणात बापाने आपल्या मुलाचा डोक्मयात व हातावर खुरप्याने वार करून खून केल्याची घटना शनिवारी रात्री आलास (ता. शिरोळ) येथे घडली. राजू उर्फ मेहबूब बाबू मुराशे (वय 27) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी रजिया बाबू मुराशे यांनी कुरूंदवाड पोलिसात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांतून समजलेली हकिकत अशी, बाबू मुराशे (वय 55) यांच्याकडे मुलगा राजू याने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यामुळे या दोघांत वाद झाला. या वादातून संतप्त झालेल्या बाबू मुराशे यांनी ऊस तोडणीचे खुपरे घेऊन मुलग्याच्या डोकीवर व हातावर सपासप वार केले. त्यामुळे वार वर्मी लागल्याने राजू याचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी बाबू मुराशे यास अटक करून कुरूंदवाड न्यायालयात हजर केले असता, त्यास 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास अडसूळ करीत आहेत.









