ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 69 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘टीबी हारेगा, देश जीतेगा’ या योजनेअंतर्गत टीबीचा समूळ नाश करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाच्या सादरीकरणावेळी सीतारामन म्हणाल्या, देशात पीपीपी मॉडेलनुसार नव्या रुग्णालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. 112 जिह्यांमध्ये आयुषमान भारत योजना राबविणार आहे. या योजनेअंतर्गत 20 हजार नवी रुग्णालयांना जोडण्यात येणार आहे. मिशन इंद्रधनुष्य योजनेचा विस्तार करणार करण्यात येणार आहे. छोटय़ा जिह्यांमध्ये आरोग्य योजना सुरू केल्या जातील.









