वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या पहिल्या अनाधिकृत कसोटी सामन्यात खेळाच्या दुसऱया दिवसाअखेर यजमान न्यूझीलंड अ संघाने भारत अ संघाविरूध्द आपली स्थिती अधिक मजबूत केली आहे. भारत अ च्या पहिल्या डावातील 216 धावांना प्रत्युत्तर देताना न्यूझ्रीलंड अ संघाने पहिल्या डावात 5 बाद 385 धावा झळकविल्या. न्यूझीलंड अ संघातील क्लेव्हरने नाबाद शतक तर चॅपमनने नाबाद 85 धावा झळकविल्या.
न्यूझीलंड अ ने 2 बाद 105 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. यंगने 6 चौकाकासह 54 धावा जमविल्या तर पटेलने 38 धावांचे योगदान दिले. या जोडीने 66 धावांची भागिदारी केली. फिलीप्स 4 धावावर बाद झाला. क्लेव्हर आणि चॅपमन यानी सहाव्या गडय़ासाठी अभेद्य 209 धावांची भागिदारी केली. क्लेव्हर 194 चेंडूत 111 धावावर खेळत असून चॅपमन 8 चौकारासह 85 धावावर खेळत आहे. भारत अ संघातर्फे वॉरियरने 2 तर मोहम्मद सिराज, नदीम आणि पोरल यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलप् भारत अ प डाव-54.1 षटकात सर्वबाद 216, न्यूझ्ा़ाrलंड अ प डाव 114 षटकात 5 बाद 385 (क्लेव्हर खेळत आहे 111, चॅपमन खेळत आहे 85, यंग 54, पटेल 38, वॉरियर 2-74).









