वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
आयसीआयसीआय बँकेने एक अनोखी सुविधा सुरु केली आहे. या सुविधेमधून ग्राहकांना आपले घर आफिस किंवा बँकेच्या सुट्टीच्या दिवसांमध्येही बँक व्यवहार करण्याची संधी सात दिवसांमध्ये 24 तास मिळणार आहे. त्यामध्ये डेबिड कार्ड, पेडिट कार्ड किंवा चेक घेण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचे नाव आहे. ‘आयबॉक्स’ हे एटीएम प्रमाणे एक मशिन असणार आहे. यांच्या अंतर्गत या सुविधा मिळणार असल्याचे बँकेनी सांगितले आहे.








