वारणानगर / प्रतिनिधी
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे औषधनिर्माण महाविद्यालयात रॅगिंग व महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा या विषयासंदर्भात अॅड. सौ. मेघा ठोंबरे यांचे मार्गदर्शन पार पडले. फार्मसी महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती, कोडोली पोलीस ठाणे यांच्या संयुक्त आयोजीत केलेल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात अँड.ठोंबरे यानी महिला लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याचे स्वरूप विशद करून या विषयी उदाहरण देवून विद्यार्थी व विद्यार्थीनींना कायदेविषयक मार्गदर्शन करून महत्व स्पष्ट केले. यावेळी त्यांनी विद्यार्थी – विद्यार्थीनींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकाचे निरसन केले. यावेळी कोडोली पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सुरज बनसोडे यांनी रॅगिंग आणि अँटी रॅगिंग कायदे व त्याविषयी माहिती करून दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. जॉन डिसोझा यांनी स्वागत करून प्रास्ताविकात व्याख्यान आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी फार्मसी डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. सी. एम्. जमखंडी उपस्थित होते.व्याख्यानाच्या नियोजना करिता प्रा.मयूरेश शिंदे, डॉ.एस सी बुर्ली, यांनी परिश्रम घेतले.
प्रा. वृंदा खानविलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व प्रा. सुनीता शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.