ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर व माजी राज्यसभा खासदार पवन वर्मा यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जनता दल (युनायटेड) पक्षाचे महासचिव आणि प्रवक्ते के. सी. त्यागी यांनी याबाबत माहिती दिली.
ते म्हणाले, पक्ष शिस्त मोडणे आणि पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल प्रशांत किशोर व पवन वर्मा यांच्यावर ही कारवाई केली असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही महिन्यांपासून प्रशांत किशोर यांनी वादग्रस्त वक्तव्य केली होती. त्यांची ही वक्तव्य पक्षाच्या निर्णयाविरोधातील होती.
तसेच प्रशांत किशोर यांनी पक्ष अध्यक्ष नितीश कुमार यांच्याविरोधतही अपमानास्पद वक्तव्य केली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे असंही ते म्हणाले.