ऑनलाईन टीम / पुणे :
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीसपदी संकेत संजय शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. हडपसर विधानसभा मतदार संघाचे आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संकेत शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यात नव्याने पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. त्यामध्ये संकेत शिंदे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल ननावरे आणि पदाधिकारी उपस्थित होते.









