वाळपई प्रतिनिधी
गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सहा वेळा भूषविणारे विद्यमान पर्यंत मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे यांचा 82 वा वाढदिवस हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थक व हितचिंतकांच्या साक्षीने साजरा करण्यात आला .
त्यांच्या साखळी येथील कुळण या निवासस्थानी सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत समर्थक व हितचिंतक यांची मोठय़ा प्रमाणात गर्दी जमलेली पहावयास मिळाली. दिवसभर त्यांनी आपले चहाते व समर्थकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या व गेल्या पाच दशकांपासून सत्तरी तालुक्मयातील दोन्ही मतदारसंघाच्या मतदारांनी त्यांच्यावर दाखविलेल्या विश्वासाला आपण आपल्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून पात्र ठरल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या .
यासंदर्भात माहिती अशी की गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व सहा वेळा मुख्यमंत्री पद भूषविणारे त्याचप्रमाणे सभापती विरोधी पक्षनेते अशा विविध पदाना समर्थपणे न्याय देणारे प्रतापसिंह राणे यांचा 82 वा वाढदिवस आज हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या समर्थकांच्या साक्षीने पार पडला.
सकाळी प्रतापसिंह राणे यांनी देवपूजा केली व सर्व कुटुंबियांच्यावतीने त्यांचे कुंकुमार्चन करण्यात आले. तदनंतर आठ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून समर्थक मोठय़ा संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा प्रदान केल्या. महत्त्वाचे म्हणजे सत्तरी तालुक्मयाच्या अत्?यंत कानाकोपऱयातून त्यांचे ज्ये÷ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते हितचिंतक चाहते व इतरांनी उपस्थिती लावून त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री ,मंत्री व इतर आमदारांची उपस्थिती.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री तथा साखळी मतदारसंघाचे आमदार डॉक्टर प्रमोद सावंत हे आपल्या पत्नी सौ सुलक्षण सुलक्षणा सावंत यांच्यासह उपस्थित राहून प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रतापसिंह राणे हे गोव्याच्या राजकारणातील एक आदर्श असे व्यक्तीमत्व आहे .त्यांनी गोवा राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता आपल्या प्रामाणिक व उच्चवर्णीय विचारांच्या माध्यमातून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी साकार केलेल्या अनेक प्रकल्प गोव्याच्या जनतेच्या विकासासाठी समर्पक ठरत आहेत . आतापर्यंत त्यांनी समाजासाठी दिलेले योगदान व सरकारच्या माध्यमातून वेगवेगळय़ा प्रकारच्या योजना अमलात आणून सर्वसामान्यांच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले असून त्यांचा अनुभव येणाऱया काळातही सरकारच्या चांगल्या कार्यपद्धतीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर मनोहर आजगावकर मंत्री जेनिफर मोन्स?रात वीजमंत्री निलेश काब्राल मायकल लोबो खासदार फ्रान्सिस सार्दिन आमदार दिगंबर कामत सुभाष शिरोडकर सभापती राजेश पाटणेकर बाबूश मोन्स?रात चर्चिल आलेमाव रवी नाईक सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाऊसकर माजी खासदार नरेंद्र सावईकर भाजपाचे संघटनमंत्री सतीश धोंड प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे पदाधिकारी दत्ता खोलकर त्याचप्रमाणे वाळपई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अख्तर शहा, साखळी नगरपालिकेचे नगराध्यक्ष धर्मेश सागलानी नगरसेवक जिल्हा पंचायत सभासद प्रेमनाथ हजारे सरस्वती वाडकर पांडुरंग गावकर,सत्तरी तालुक्मयातील विविध पंचायतीचे सरपंच ज्ये÷ कार्यकर्ते व इतरांचा यावेळी प्रामुख्याने समावेश होता. गोवा राज्याचे आरोग्यमंत्री विश्?वजित राणे यांनी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत व इतर मंत्र्यांचे स्वागत केले व त्यांनी आपल्या वडिलांना दिलेल्या शुभेच्छा त्यामुळे सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.
सत्तरी तालुक्मयातील मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी
सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा पंचायत क्षेत्रातील अति ग्रामीण भागातून वयोवृद्ध नागरिक ज्ये÷ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या अशा हजारोच्या संख्येने उपस्थिती लावून प्रतापसिंह राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत प्रचंड प्रमाणात गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. नागरिकांची कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये म्हणून आरोग्यमंत्री विश्?वजित राणे हे मोठय़ा प्रमाणात धावपळ करत असताना दिसत होते. त्याचप्रमाणे सर्वांची चांगल्या प्रकारे व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी सोयी संदर्भात विशेष लक्ष दिले. सत्तरी तालुक्मयातील वेगवेगळय़ा गावांमध्ये नागरिकांच्या सोयीसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे आपल्या साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते व चाहत्यांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले.









