वृत्तसंस्था/ बर्लीन
येथे झालेल्या सहा दिवसांच्या बर्लीन आंतरराष्ट्रीय सायकलींग स्पर्धेत भारताचा सायकलपटू इसो अल्बेनने पुरूषांच्या किरीन वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. 18 वर्षीय अल्बेनने या क्रीडा प्रकारात 20 गुणांसह सुवर्णपदक मिळविले. झेक प्रजासत्ताकच्या बेबेकने रौप्य तर जर्मनीच्या लीव्हने कास्यपदक मिळविले.









