ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतात मागील पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे 25 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याची माहिती अमेरिकेने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे. ही माहिती शेअर करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांसोबत करार केले होते.
अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉयटेड चिडेनकडून भारताच्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोकडे हा डेटा देण्यात आला आहे. त्यानुसार , भारतात मागील पाच महिन्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचे 25 हजारांहून अधिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. यामधील सर्वाधिक प्रकरणे दिल्लीतील आहेत. त्यानंतर महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालचा नंबर लागतो. महाराष्ट्रातील एकून 1700 प्रकरणे समोर आली असून, ती सायबर विभागाकडे पाठविण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि पुण्यातील ही जास्त प्रकरणे उघडकीस आली आहेत. पोक्सो कायद्यांतर्गत याप्रकरणात कारवाई करण्यात येत असून, देशभरात अटकसत्र सुरू करण्यात आले आहे.









