गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही ‘श्री गणेश जयंती’ म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्टय़ म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्र पटीने कार्यरत असते.
गणेश जयंती हा सण महाराष्ट्र आणि गोवा येथे माघी गणेशोत्सव म्हणून ओळखला जातो. मराठी महिन्यातील माघ महिन्यात शुक्ल चतुर्थी दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते. गणेश जयंती हा दिवस तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी, विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणेशभक्त मोठय़ा उत्साहात हा सण साजरा करतात.
गणेश जयंती दिवशी काय केले जाते
? गणेश जयंती दिवशी हळद किंवा सिंदूर यांनी गणेश मूर्ती बनवण्याची प्रथा आहे. या गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे विसर्जन केले जाते. काही घरांमध्ये भाद्रपदाप्रमाणेच माघ गणेशोत्सवामध्येही गणपतीची मूर्ती घरी आणली जाते.
? गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते त्यामुळे यादिवशी गणपतीला तीळापासून बनवलेल्या पदार्थांचा प्रसाद दाखवला जातो. यादिवशी तीळाच्या पेस्टने स्नान केले जाते.
?गणेश जयंती दिवशी गणपतीच्या आवडीचा मोदकाचा प्रसाद ठेवला जातो. त्यासोबतच तीळाचा एखादा पदार्थ नैवेद्य म्हणून बनवला जातो. गणेशभक्त गणपतीच्या देवळात जाऊन दर्शन घेतात.









