वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले येथील नवदुर्गा देवस्थानच्या महाजनात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकाऱयानी देवस्थानच्या प्रमुख दरवाजा टाळे ठोकले होते .यासंदर्भात वाद म्हापसा येथील सत्र न्यायालयात प्रलंबित होता. या संदर्भातला निर्णय नुकताच झाला असून न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार आज दुपारी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदार यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात बंद करण्यात आलेले मंदिराच्या दरवाजा उघडण्यात आला असून त्यामुळे आता भाविकांना नवदुर्गेच्या दर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे गावातील भाविकांनी आनंद व्यक्त केला असून 8 ऑक्टो?बर पासून सदर देवस्थानाचा दरवाजा बंद करण्यात आला होता.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले येथील जागृत समजल्या जाणाऱया नवदुर्गा देवस्थानाच्या महाजनात मतभेद निर्माण झाले होते. 8 ऑक्टो?बर रोजी दसरा सण साजरा करीत असताना यासंदर्भात वाद निर्माण झाला होता
8 रोजी देवस्थानच्या महाजनात वाद
8 ऑक्?टोबर रोजी पारंपारिक दसरा साजरा करण्यात येत असताना दोन गटातील महाजना दरम्यान मोठा वाद निर्माण झाला होता. काही महाजनांनी देवस्थानच्या मंदिराचे बांधकाम सुरू असल्यामुळे देवीला देवस्थानाच्या बाजूलाच वेगळी गर्भकुड करून सदर ठिकाणी बसविण्यात आली होती .मात्र यादिवशी अवसार येऊन देवीने पूर्वीच्या ठिकाणी म्हणजे प्रमुख मंदिराच्या गर्भवती मध्ये प्रवेश केल्यामुळे वादाला ठिणगी पडली होती .दोन्ही गटातील परस्परांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यामुळे देवस्थानच्या परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या संदर्भाची दखल घेऊन सदर तालुक्मयाच्या उपजिल्हाधिकारी मंगलदास गावकर, मामलेदार अनिल राणे व संबंधित खात्याच्या यंत्रणेने तात्काळ धाव घेऊन दोन्ही गटात दरम्यान समेट घडवून आणण्यात संदर्भात प्रयत्न केला होता. मात्र याला यश न आल्यामुळे नाईलाजास्तव मंदिराच्या प्रमुख दरवाजा टाळे ठोकावे लागले होते.
8 ऑक्टो?बर पासून देवीची पूजा बंद होती
दरम्यान सरकारच्या यंत्रणेमुळे व महाजनात निर्माण झालेले मतभेद मोठय़ा प्रमाणात ताणल्यामुळे देवस्थानाचा दरवाजे बंद करावा लागला होता .यामुळे नवदुर्गा देवीची पूजाअर्चा ऑक्टो?बर पासून पूर्णपणे बंद करण्यात आली होती. देवस्थानला ठोकण्यात आलेले टाळे हे पूर्णपणे बेकायदेशीर असून ते पुन्हा उघडावे व देवस्थानाच्या पूजा-अर्चना प्रारंभ व्हावा अशा स्वरूपाची मागणी करणारी याचिका एका गटातर्फे मापसा येथील सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
मंदिराचे ताळे उघडण्याचे न्यायालयाचे निर्देश
दरम्यान सदर न्यायालयाचे न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांनी दिलेल्या खास आदेशानुसार सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदाराना या देवस्थानाचा दरवाजा पोलीस बंदोबस्त व इतर यंत्रणेच्या समक्ष उघडण्याचे निर्देश दिले. 24 जानेवारी सदर आदेश देण्यात आलेले होते. या संदर्भात एक महत्वाची बैठक शुक्रवारी सत्तरी तालुक्मयाच्या मामलेदारांनी घेतली व यामध्ये दोन्ही गटाच्या प्रतिनिधींना समाविष्ट करून घेण्यात आले होते. त्यांनी न्यायालयाच्या निकालाचा संदर्भात याबैठकीमध्ये सविस्तरपणे चर्चा केली व शनिवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात देवस्थानाच्या दरवाजा उघडण्यात आज शनिवारी उघडण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आज दुपारी मामलेदार अनिल राणे व पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या उपस्थितीत दरवाजाला घालण्यात आलेले कुलूप उघडण्यात आले. यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी आनंद व्यक्त करीत नवदुर्गा माता की जय अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
आनंदाचे वातावरण
दरम्यान गेल्या चार महिन्यापासून देवीची दैनंदिन पूजा पूर्णपणे बंद झाली होती. चार महिन्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार देवस्थानाला ठोकण्यात आले टाळे उघडण्यात आल्यानंतर देवीच्या दर्शनामुळे भाविकांनी आनंद व्यक्त करीत यदेवीप्रती आपला भक्ती प्रदान केली. यावेळु नवदुर्गा माता की जय अशा घोषणा देऊन परिसरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्या प्रकारचे कृती याच्या माध्यमातून परस्पर गटाला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू नये अशा प्रकारचे आवाहन केले.
पोलिस बंदोबस्त तैनात
8 ऑक्टो?बर रोजी निर्माण झालेल्या प्रचंड तणावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थानाच्या टाळे ठोकण्यात आल्यानंतर आज उघडण्यात आले. यामुळे याभागांमध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होणार नाही. याची खबरदारी म्हणून मंदिर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे .या प्रकारची माहिती पाहिजे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी दिली आहे. या भागांमध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही यावर ही यंत्रणा बारकाईने लक्ष देणार असल्याचे श्री वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे.
सोमवारी देवस्थानचा कालोत्सव
दरम्यान या देवस्थानाच्या महाजनानी दिलेल्या माहितीनुसार नवदुर्गा देवस्थानचा पारंपारिक कालोत्सव सोमवारी साजरा होणार आहे. यामुळे देवदर्शनाचा भाविकांनी मोठय़ा प्रमाणात लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन देवस्थानच्या समितीतर्फे करण्यात आलेले आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून देवस्थानचा उत्सव साजरा करण्याची प्रथा असून पूर्वीप्रमाणेच यंदाचा कालोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
दिवसभर ओटी व नवस फेडण्याचा कार्यक्रम व रात्री उशिरा केरी येथील कलासंगम दशावतार नाटय़ मंडळाचा दशावतारी नाटय़प्रयोग सादर होणार असल्याची माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष विजय वसंत परब यांनी दिली असून भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









