शिरोळ/प्रतिनिधी
येथील नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रकाश गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. गावडे यांची उपनगराध्यक्षपदी निवड घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी, गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला. या बैठकीस भाजपाचे सातही सदस्य अनुपस्थित होते. गावडे हे दुसरे उपनगराध्यक्ष झाले आहेत.
उपनगराध्यक्ष योगेश पुजारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आज सकाळी दहा ते बारा या दरम्यान उपनगराध्यक्ष पदासाठी गावडे यांचा एकमेव अर्ज आला. सभा अध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी गावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे घोषित केले. प्रारंभी मुख्याधिकारी तैमुर मुलालनी यांनी स्वागत केले. या बैठकीस नगरसेवक योगेश पुजारी, तातोबा पाटील, राजेंद्र चुडमुगे, कमलाबाई शिंदे, जयश्री धर्माधिकारी, करुणा कांबळे, सुरेखा पुजारी, कुमुदिनी कांबळे, पंचायत समिती सदस्य सचिन शिंदे, प्रसाद धर्माधिकारी, पद्मसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
नूतन उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून काम केले आहे. नुतन उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की सर्वांना विश्वासात घेऊन विकास करणार असल्याचे सांगितले. यावेळी अनेक मान्यवर गावडे यांचे अभिनंदन केले.