ऑनलाईन टीम / पुणे :
जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना…जिंदगी कैसी है पहेली कभी तो हसाये, कभी ये रुला दे, अशा जीवनाचे मर्म सांगणाºया गीताबरोबरच अच्छा तो हम चलते है, सच्चाई छुप नही सकती, जीवन से भरी तेरी आँखे अशा हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये इतिहास निर्माण करणाºया सदाबहार गाण्यांनी चित्रपट संगीताचा सुवर्णकाळ उलगडला.
निमित्त होते रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो तर्फे आयोजित आणि फर्माइशे प्रस्तुत ये शाम मस्तानी अभिनेते राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे. यशवंराव चव्हाण नाट्यगृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची संकल्पना प्रवीण गोखले यांची होती. गायकांचा मधुर आवाज, त्याला वादकांची मिळालेली साथ आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद अशा उत्साहपूर्ण आणि संगीतमय वातावरणात रसिकांनी पुन्हा एकदा राजेश खन्ना यांचा चित्रपट प्रवास गाण्यांच्या माध्यमातून अनुभवला.
प्रशांत नासेरी यांनी राजेश खन्ना यांच्या आराधना या गाजलेल्या चित्रपटातील मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात करताच रसिकांनी त्यांना टाळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर धवल चांदवडकर यांनी अकेले हे चले आओ या गीताने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कृषा चिटणीस यांनी गायलेल्या गुन गुना रहे है भवरे खील रही है कली कली आणि ये मेरे दील के चैन या गाण्यांनी रसिकांना राजेश खन्ना यांच्या संगीतमय प्रवासाची सफर घडवून आणली.
ये रेशमी जुल्फे, ये शाम मस्तानी, चुनरी संभाल गोरी, भीगी भीगी रातो मे, वो शाम कुछ अजीब थी, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, आणि जय जय शिवशंकर काटा लगे ना कंकर अशा राजेश खन्ना यांच्या गाजलेल्या गाण्यांनी गायक आणि वादकांनी कार्यक्रमाचा सर्वोच्च बिंदू गाठला.